Taj Mahal | ताजमहालच्या २२ बंद खोल्यात भगवान शंकराचा निवास; भाजपाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taj Mahal
ताजमहालच्या २२ बंद खोल्यात भगवान शंकराचा निवास; भाजपाचा दावा

ताजमहालच्या २२ बंद खोल्यात भगवान शंकराचा निवास; भाजपाचा दावा

ताजमहालमध्ये बंद असलेल्या २२ खोल्यांमध्ये हिंदू देवीदेवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. या खोल्या उघडून चौकशी करण्यात यावी, अशी याचिकाही या नेत्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. लखनौ खंडपीठाकडे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अयोध्येत भाजपाच्या सोशल मीडिया प्रभारींनी ही याचिका दाखल केली आहे. ताजमहालमधल्या २२ खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या खोल्या उघडा आणि तपास करण्याचे आदेश पुरातत्व विभागाने द्यावेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.

या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांचा संदर्भही देण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ताज महाल हा पूर्वी एक जुनं शंकराचं मंदिर होतं. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की तेजो महालय अर्थात ताज महाल हे ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे, असंही या याचिकेत म्हटलं आहे. ताजमहालमधल्या २२ खोल्या या कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र पी.एन.ओक आणि लाखो हिंदू भाविकांचा हा विश्वास आहे की या बंद खोल्यांमध्ये भगवान शंकरांचं अस्तित्व आहे, असा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे.

टॅग्स :taj mahalAgra Taj Mahal