तिजोरी उघडा, गरीबांना मदत करा; सोनिया गांधी यांचे सरकारला आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 29 May 2020

भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसने सामाजिक मोहिम राबविण्याचा निर्धार केला आहे,असे सोनिया म्हणाल्या.सरकारने पुढाकार घेऊन मजूर,शेतकरी,उद्योग या सर्वांना दिलासा देण्याची व मदत करण्याची ही वेळ आहे.

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या गरीबांना सरकारने आपला तिजोरी उघडून दरमहा ७५०० रुपये द्यावे यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सामाजिक मोहिमेची घोषणा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केली आहे. या सोशल मीडिया मोहिमेसाठी सर्वसामान्यांनाही त्यांनी साद घातली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोनिया गांधींनी आज व्हिडीओ संदेशाद्वारे हे आवाहन केले. सरकारने पुढाकार घेऊन मजूर, शेतकरी, उद्योग अथवा लहान व्यावसायिक या सर्वांना दिलासा देण्याची आणि मदत करण्याची ही वेळ आहे, असे पहिल्या दिवसापासून काँग्रेसमधील सहकारी, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. परंतु, ही गोष्ट समजून घेण्यास आणि आणि अंमलबजावणी करण्यास सरकार का नकार देत आहे हे कळायला मार्ग नाही. भारताचा हा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसने सामाजिक मोहिम राबविण्याचा निर्धार केला आहे, असे सोनिया म्हणाल्या. विरोधी पक्षांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतील मंजूर संयुक्त मागणीपत्रातील मागण्यांचा पुनरुच्चार सोनियांनी या निमित्ताने केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काँग्रेसच्या मागण्या 
- प्रत्येक कुटुंबाला सहा महिन्यांपर्यंत दरमहा रोख ७५०० रुपये द्यावे 
- मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था करावी 
- त्यांना रोजगार आणि मोफत अन्नधान्य देण्याचीही व्यवस्था करावी 
- मनरेगा योजनेत रोजगाराचे दिवस २०० करावे 
- सूक्ष्म, लघु उद्योगांना कर्ज देण्याऐवजी आर्थिक सहाय्य करावे 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण देश रोजगाराच्या संकटाला तोंड देत आहे. लक्षावधी मजूर कोणतीही प्रवासाची साधने, औषधोपचार नसताना उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालत घरी जायला निघाले. त्यांची वेदना प्रत्येकाने ऐकली. पण सरकारने नाही. कोट्यवधी रोजगार बंद झाले. पिकांच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना दारोदारी भटकावे लागले. त्यांची ही अवस्था संपूर्ण देशाने पाहिली. पण सरकारला त्याची काहीही जाणीव नाही. 
- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open The Locks Of Treasury help the poor Sonia Gandhi appeal to the government