
नवी दिल्ली : ‘‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असून येत्या काळात याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल,’’ असे हवाई दलाने आज स्पष्ट केले. शनिवारी पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर माहिती सांगताना, ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच राहणार असल्याचे हवाई दलाने आज सोशल मीडियाद्वारे सांगितले. दरम्यान, उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.