सावंतवाडी : भारतीय सैन्याने पाकिस्तानमधून भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्य दहशतवादाविरुद्धच्या या कारवाईत पूर्णपणे यशस्वी झाले आहे. पाकिस्तानलाही दहशतवादाचे दुष्परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर ‘इंटरनॅशनल फ्रंट अगेन्स्ट टेररिस्ट’ उभारण्याची गरज आहे. केवळ सैन्य कारवाईने दहशतवाद संपणार नाही, तर त्यांच्या मनात भरवलेली विषवल्ली दूर करणेही आवश्यक आहे, असे माजी केंद्रीय मंत्री तथा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.