Operation Sindoor : ही कारवाई तर केवळ सुरुवात : निवृत्त जनरल- मनोज नरवणे

India Strikes Back : पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशवादी कारवायांना 'जशाच तसे' उत्तर देण्याची गरज आहे. नागरी सुरक्षेसाठी देशभरात केलेल्या ड्रिल्स या जनतेला संभाव्य धोक्यांची जाणीव करून देणारे आहेत.
Operation Sindoor
Operation Sindoor Sakal
Updated on

Operation Sindoor : दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोनच आठवड्यांनंतर नऊ ठिकाणी २४ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात दूरपर्यंत पसरलेल्या दहशतवादी अड्ड्यांना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करण्यात आले. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे मार्मिक नाव देण्यात आले आहे. या कारवाईतून योग्य वेळी अचूकपणे लक्ष्यभेद करण्याची भारतीय संरक्षण दलांची क्षमता दिसून आली आहे. पाकिस्तान अत्यंत दक्ष असतानाही, ही कारवाई करण्यात आली आणि निश्चित केलेल्या लक्ष्यांवर यशस्वी हल्ला करण्यात आला. यातून, भारतीय संरक्षण दलांची सर्वोच्च क्षमता आणि व्यावसायिकता दिसून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com