
भारताने दहशतवादाविरोधातील आपल्या संघर्षाला निर्णायक वळण देत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील ९ दहशतवादी तळांवर अचूक एअर स्ट्राईक केली. ही कारवाई मध्यरात्रीनंतर सुमारे १.३० वाजता पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वायुदलाने बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद या भागांतील दहशतवादी तळांना लक्ष्य करत अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक हल्ला केला. या कारवाईसाठी आधीपासूनच बारकाईने योजना आखण्यात आली होती. हे सर्व हल्ले अत्यंत सावधगिरीने आणि धोरणात्मक पद्धतीने करण्यात आले.