
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. यानंतर भारतीय लष्कराने याबाबत अधिकृत माहिती दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केले, पण यात त्यांनी इस्त्रोने केलेल्या कामगिरीचे कौतुक करत पाकिस्तानला अनुल्लेखाने मारले.