
Operation Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात पीओकेतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतानं नुकतंच ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशनवर तसंच काल पाकिस्ताननं सीमेवरील भारताच्या तीन राज्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (आरएसएस) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी यामध्ये भारतीय नागरिकांना मोठं आवाहन केलं आहे.