
India Vs Pakistan: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी एका मुलाखतीत कबूल केले आहे की, भारताने त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, त्यांनी असेही म्हटले की, भारतीय लष्कराने हल्ला सुरू केल्यानंतर ४५ मिनिटांच्या आत सौदी राजकुमार फैसल बिन सलमान यांनी संपर्क साधला.
फैसल बिन यांनी डार इशाक डार यांना विचारलं की, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलून ते हल्ला थांबवण्याची विनंती मान्य करतील का आणि पाकिस्तान थांबण्यास तयार आहे का?