
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सध्या उच्च पातळीवर आहे. 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून सीमेपलीकडील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईने पाकिस्तानला धक्का बसला असून, आता तुर्कीच्या TRT वर्ल्ड या वृत्तवाहिनीने मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) असीम मलिक यांनी भारताचे NSA अजित डोवाल यांच्याशी फोनवर चर्चा केली. ही बातचीत बुधवारी रात्री उशिरा झाल्याचे सांगितले जात आहे.