
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल माहिती देताना विरोधकांना एकजूट राखत सरकारला साथ देण्याचे आवाहन केले, अशी सुत्रांची माहिती आहे. दरम्यान आज ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. मात्र या बैठकीला पंतप्रधान उपस्थित राहू शकले नाहीत. गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.