नवी दिल्ली - ‘ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाला व्यापक आणि नवीन वळण मिळाले आहे, असे लष्करातील सूत्राने म्हटले आहे.
या कारवाईत लष्करे तय्यबा, जैशे महंमद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या प्रमुख तळांवर लक्ष्य करण्यात आले. भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतासह बहावलपूरसारख्या सर्वाधिक दहशतवादीप्रवण भागांमध्ये घुसखोरी केली. या ठिकाणी अमेरिका देखील ड्रोन तैनात करण्यास मागेपुढे पाहत होती.