नवी दिल्ली आम्ही काही करण्याआधीच भारताच्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्रानं पाकिस्तानची कशी अवस्था करुन ठेवली हे अखेर पाकिस्ताननं मान्य केलं आहे. या आशयाचं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एका जाहीर केलं. सुरुवातीला शरीफ यांनी सागंगित होतं की, भारताच्या हल्ल्याला पाकिस्ताननं जशास-तसं उत्तर दिपलं आहे. पण आता ऑपरेशन सिंदूरमुळं आमचं किती नुकसान झालंय ते दाखवताहेत. अझरबैझानमधील लाचिन इथं एका द्विपक्षिय शिखर संमेलनात ते बोलत होते.