
नवी दिल्ली : देशातील सर्व निमलष्करी दलातील सैनिकांच्या सुट्या रद्द करून त्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचा आदेश द्यावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व निमलष्करी दलाच्या प्रमुखांना बुधवारी दिली. भारताच्या ‘आॅपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं केवळ एअर स्ट्राईकच्या कारवाईवरच भारताचं भागणार नाही, तर आणखी काहीतरी वेगळ्या हालचाली होऊ शकतात, अशी चर्चा सुरु झाली आहे.