
Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी केलं. पण या अत्यंत गोपनिय मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना साऊथ ब्लॉकमध्येच राहण्याची सोय करण्यात आली होती. इथून बाहेर न पडण्याचे स्पष्ट आदेश त्यांना देण्यात आले होते. त्याचबरोबर इतरही अनेक नियम त्यांना पाळावे लागले, त्यामुळं या मोहिमेची नेमकी तयारी कशी झाली? याची गुप्तता कशी पाळली गेली, याबाबतची इनसाईड स्टोरी जाणून घेऊयात.