Opinion Poll: बंगालमध्ये पुन्हा ममतादीदींची जादू, भाजपला झटका; 5 राज्यात कोणाची सत्ता?

Opinion Poll bengal mamta banarjee tmc bjp
Opinion Poll bengal mamta banarjee tmc bjp

नवी दिल्ली- पश्चिम बंगाल, आसाम सह अन्य पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सर्वे एजेन्सी सी-वोटरने मतदारांचा मूड काय असेल याबाबत आपोनियम पोल जारी केला आहे. यानुसार, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बँनर्जी यांची सत्ता येताना दिसत आहे. असे झाल्यास टीएमसीची राज्यात हॅट्रिक होईल. दुसरीकडे, भाजपनेही चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे. आसाममध्ये काँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे. बंगाल ते केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये ओपेनियन पोलमध्ये जनतेचा काय मूड आहे जाणून घेऊया...

बंगालमध्ये पुन्हा ममतादीदींची जादू?

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममतादीदींची जादू पाहायला मिळू शकते. एबीपी न्यूज आणि सर्वे एजेन्सी सी-वोटरच्या ओपेनियन पोलनुसार, टीएमसीला 148 ते 164 जागा मिळू शकतात. भाजपची कामगिरीही चांगली असेल. भाजपला 92 ते 108 जागा मिळू शकतात. पण, तीन दशके सत्तेत राहणाऱ्या डाव्या पक्षांना झटका बसणार आहे. काँग्रेसची कामगिरी नाराशाजनक असणार आहे. अनुमानानुसार काँग्रेस-डाव्या आघाडीला 31 ते 39 जागा मिळू शकतात. 

पुदुचेरीत येऊ शकते भाजप सरकार

पुदुचेरीत काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलनुसार, पुदुचेरीत भाजप सत्तेत येऊ शकते. पुदुचेरीत भाजपला 17 ते 21 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 8 ते 12 जागा मिळू शकतात. 

केरळमध्ये डाव्यांचीच सत्ता

ओपेनियन पोलनुसार, केरळमध्ये डाव्यांचा किल्ला वाचू शकतो. सीपीआय(एम) च्या नेतृत्वातील एलडीएफला निवडणुकीत 83 ते 91 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफला 47 ते 55  जागा मिळू शकतात. भाजपला 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात सरकार बनवण्यासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. 

आसाममध्ये पुन्हा भाजप सरकार?

ओपेनियन पोलनुसार, आसाममध्ये भाजप सरकार बनवताना दिसत आहे. भाजपच्या आघाडीला 68 ते 76 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या आघाडीला 43 ते 51 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अन्यांना 5 ते 10 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. 

तमिळनाडूचा थलायवा कोण?

ओपेनियन पोलनुसार, तमिळनाडूमध्ये डीएमके आघाडीची पुन्हा वापसी होणार आहे. डीएमकेच्या आघाडीला 154 ते 162 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे एमआयएडीएमकेला 58 ते 66 जागा मिळतील. अन्यांच्या खात्यात 8 जागा जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com