esakal | उभारणीत सामान्यांनाही सहभागाची संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

Govinddev-Giri-Maharaj

अयोध्येतील नियोजीत मंदिराच्या उभारणीसाठी निवडक कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात महिलांचाही समावेश असेल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार श्री स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली. मंदिरासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा किमान निधी लागणार असून त्यासाठी १० कोटी नागरिकांकडून सहभाग घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

उभारणीत सामान्यांनाही सहभागाची संधी 

sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे - अयोध्येतील नियोजीत मंदिराच्या उभारणीसाठी निवडक कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात महिलांचाही समावेश असेल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार श्री स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली. मंदिरासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा किमान निधी लागणार असून त्यासाठी १० कोटी नागरिकांकडून सहभाग घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गोविंददेव गिरी महाराज यांचा मठ पुण्यात आहे. न्यासाचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यावर सध्या ते अयोध्यात भूमिपूजनाच्या नियोजनात मग्न आहेत. या पार्श्‍वभूमीवर राम मंदिराबाबत ते म्हणाले, राम मंदिर उभारणीसाठी सहभाग नोंदवावा, अशी देशातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

परंतु, सर्वांनाच सहभागी करून घेणे शक्‍य नाही. त्यामुळे विवेकानंद स्मारकाच्या धर्तीवर विशिष्ट काळासाठी सेवा बजावण्यासाठी निवडक नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यांची राहण्याची तेथे व्यवस्था करण्यात येणार असून त्याचे नियोजन सध्या सुरू आहे. तसेच मंदिर लोकसहभागातून उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ नागरिकांनी घरात बसून पाहवा. रामनामाचा जप करावा. कारण त्याचे महत्त्व महात्मा गांधींजींनीही स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्रातून नद्यांचे पाणी
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी राज्याच्या विविध भागातील मंदिरांतील माती आणि प्रमुख नद्यांचे जल पाठविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने नागपूर, रामटेक, माहुर, नांदेड, पैठण, औरंगाबाद, नंदूरबार (तापी), तूळजापूर, देहू, आळंदी, भीमाशंकर, जेजुरी, सज्जनगड, शिर्डी, कोल्हापूर, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, कोकणातील रायगड, बाणगंगा देवस्थान, सांदिपनी आश्रम पवई यासह विविध ठिकाणातील जल आणि मातीचा समावेश आहे. यासाठी पंधरा दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती विश्‍व हिंदू परिषदेचे श्रीरंग राजे यांनी दिली. 

Edited By - Prashant Patil