
नवी दिल्ली : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेण्याबाबतच्या ‘एक राष्ट्र एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या प्रकारामुळे राज्यघटनेच्या संरचनेला धक्का बसेल, असा दावा करत ‘इंडिया’ आघाडीने प्रस्तावाला विरोध केला आहे.