
नवी दिल्ली : पहलगाममधील हल्ला रोखण्यात गुप्तचर यंत्रणांना आलेले अपयश, भारत-पाकिस्तानचा संघर्ष थांबविण्यासाठी मध्यस्थी केल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे दावे, बिहारमधील मतदार पडताळणीच्या नावाखाली सुरू असलेली अघोषित आणीबाणी यासारख्या मुद्द्यांवर यावर संसद अधिवेशनात सरकारला आक्रमकपणे जाब विचारण्याचा निर्धार विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने आज व्यक्त केला.