Opposition Meet: 'इंडिया'च्या कल्पनेवर आक्रमण होत आहे, त्याविरोधात आमची लढाई - राहुल गांधी

भाजपविरोधी पक्षांची दुसरी बैठक आज बंगळुरु इथं पार पडली. या बैठकीत नव्या आघाडीची घोषणा करण्यात आली.
 Rahul Gandhi in defamation case
Rahul Gandhi in defamation case esakal

बंगळुरु : भाजपविरोधी पक्षांची दुसरी बैठक आज बंगळुरु इथं पार पडली. या बैठकीत नव्या आघाडीची घोषणा करण्यात आली. या आघाडीला भारतीय राष्ट्रीय लोकशाहीवादी सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) असं नाव देण्यात आलं आहे.

यावेळी बैठकीतील मुद्द्यांची माहिती देताना आमची लढाई सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी नाही. तर आयडिया ऑफ इंडियावर जे आक्रमण होत आहे त्याविरोधात आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. (Opposition Meet Idea of India under attack our fight against it says Rahul Gandhi)

 Rahul Gandhi in defamation case
Uddhav Thackeray: अखेर ठाकरेंच्या समर्थक आमदार नरमले! विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला दिलं उत्तर

गांधी म्हणाले, आजच्या बैठकीत आमची खूपच प्रॉडक्टिव्ह चर्चा झाली. आमची लढाई ही भाजपची विचारधारा आणि त्यांच्या विचारांविरोधात आहे. ते देशावर आक्रमण करत आहेत. देशात बेरोजगारी वाढत आहे. देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हातात जात आहे. (Latest Marathi News)

 Rahul Gandhi in defamation case
Uddhav Thackeray: अखेर ठाकरेंच्या समर्थक आमदार नरमले! विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला दिलं उत्तर

या बैठकीत आम्ही आम्हालाच प्रश्न विचारला की, ही लढाई नेमकी कोणामध्ये सुरु आहे. तेव्हा चर्चा झाली की ही लढाई देशाचा आवाज चिरडला जात आहे त्याच्याविरोधात आहे. आयडिया ऑफ इंडियावर आक्रमण होत आहे, याविरोधात ही लढाई आहे. (Marathi Tajya Batmya)

भारतासमोर जेव्हा कोणी उभा राहतो तेव्हा कोण जिंकत तुम्हाला चांगलचं माहिती आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

विरोधकांनी जाहीर केलं घोषणापत्र

देशाला पर्यायी राजकीय, सामाजिक, आर्थिक अजेंड्याचं वचन देतो, असं घोषणापत्र 26 विरोधी पक्षांनी जाहीर केलं आहे. यावरुन आम्ही भाजपच्या राजकारणाला पर्यायी राजकारण देत आहोत, अशी भूमिका या विरोधीपक्षांनी मांडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com