

Delhi Protest Over Gyanesh Kumar Resignation Rahul Gandhi Priyanka Gandhi and 250 Opposition MPs Detained by Police in Delhi
sakal
नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये आज विरोधकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. संसद भवन मार्गावर विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या अडीचशेहून अधिक खासदारांनी जोरदार घोषणा देत परिसर अक्षरशः दणाणून सोडला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या आंदोलनाला नाट्यमय कलाटणी देताना आकाशवाणी भवनाला ‘जंतरमंतर’चे स्वरूप आणले. रात्री आठच्या सुमारास राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत तेथून हटविले.