

states urged to boost organ donation
sakal
नवी दिल्ली : देशात सद्यःस्थितीत मृतांच्या अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकसंख्येमागे केवळ एक एवढेच आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यांनी रुग्णालयांमध्ये विशेष पथके नियुक्त करावीत, ट्रॉमा सेंटर अद्ययावत करून अवयव पुनर्प्राप्ती केंद्रे म्हणून नोंदणी करावी, यासारखे उपाय केंद्र सरकारकडून सुचविण्यात आले आहेत. पोलिस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि पॅरा-मेडिकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रथम प्रतिसादकर्त्यांसाठी राज्य आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.