जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शकाची देशालाच धमकी, म्हणाले, यापुढे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शकाची देशालाच धमकी, म्हणाले, यापुढे...
जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शकाची देशालाच धमकी, म्हणाले, यापुढे...

जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शकाची देशालाच धमकी, म्हणाले, यापुढे...

मुंबई - दोन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या इराणी दिग्दर्शक असगर फरहादी हे सध्या चर्चेत आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. यापूर्वी देखील आपल्या परखड स्वभावामुळे फरहादी चर्चेत आले आहे. त्यांनी इराणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे ते नाराज झाले आहे. या कारणास्तव त्यांनी एक कठोर निर्णयही घेतला आहे. आता त्यांनी आपली ही नाराजी सोशल मीडियावरही व्यक्त केली आहे. इंस्टावर मोठी पोस्ट शेयर करुन त्यात इराणी सरकारचा मनमानीपणा त्यांनी समोर आणला आहे.

असगर यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी अशा सरकारशी कसा जोडला जाईल ज्यांनी मलाच जीवे मारण्याची धमकी दिली होती. मला वेळोवेळी अपमानित करण्यात आले आहे. असगर यांचा यापूर्वी ए हिरो नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्यांनी इराणी शहर शिराज मधील एका कैदीची जीवनगाथा साकारली होती. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी या चित्रपटाचे कौतूकही केले होते. असगर यांनी म्हटले आहे की, मला देशानं गेल्या काही वर्षांपासून जो त्रास दिला आहे त्यावर माझे विचार व्यक्त केले आहेत. जानेवारी 2017 आणि नोव्हेंबर 2019 मध्ये इराण देशात महिलांसंबंधी जे अन्य़ाय अत्याचार झाले त्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

जर मी ऑस्करमध्ये माझ्या चित्रपटातून सरकार विरोधी भूमिका मांडत आहे असे वाटत असेल तर मला त्याचा काही एक फरक पडत नाही. दुसरी गोष्ट अशी की, मी काही वेळा सरकारच्या दबावाला बळी पडून सौम्य भूमिका घेत आहे. तर तसे काही नाही. मला आतापर्यत इराणी प्रशासनाकडून एवढा मानसिक त्रास झाला आहे की, त्यामुळे त्यांच्यावतीनं काही करणं मला जमणार नसल्याचे असगर यांनी म्हटले आहे.

loading image
go to top