OTT Rules: ओटीटीवर आता अश्लील कंटेंट 'बॅन'? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

OTT Content Regulation: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लीलता आणि आक्षेपार्ह कंटेंटबाबत येणाऱ्या तक्रारींची संख्या वाढली असून, त्या पार्श्वभूमीवर ओटीटीवरील कंटेंटच्या नियमनासाठी स्वतंत्र कायदा आणायचा की माहिती तंत्रज्ञान कायद्यात बदल करायचे, याची केंद्र सरकारकडून चाचपणी सुरू आहे.
OTT Content Regulation

OTT Content Regulation

esakal

Updated on: 

New Delhi: वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून प्रसारीत होणाऱ्या कंटेंटचे जेवढे चाहते आहेत, तेवढेच अशा पद्धतीच्या कंटेंटला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या कंटेंटचे नियमन करण्यासाठी पावले टाकण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. सरकारने त्यासाठी नवा कायदा आणायचा की आहे त्याच कायद्यांमध्ये बदल करायचे, याची चाचपणी सुरू केली असल्याचेही सांगण्यात आले. थोडक्यात काय तर आता ओटीटी वरून कुठल्या पद्धतीचा कंटेंट तुम्ही पाहू शकता याचे नियंत्रण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com