
भारत हा बांग्लादेश, पाकिस्तानपेक्षाही गरीब; मेहबुबा मुफ्तींची मुक्ताफळं
श्रीनगर : गरिबीच्या बाबतीत भारत देश पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळच्याही मागे आहे, अशी मुक्ताफळं जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (People's Democratic Party) नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी उधळली आहेत. यावेळी त्यांनी रोजगाराबाबत केंद्र सरकारवर जोरजार हल्लाबोल केला. (Mehbooba Mufti News)
मुफ्ती म्हणाल्या की, भाजप सरकार (Bjp Government) लोकांना रोजगार देऊ शकत नाही हे दुर्दैवी असून, महागाईने (Inflation) सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे आपल्या देशाची मालमत्ता विकली जात असून, भाजपकडे लोकांना देण्यासारखे काहीच नसल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा: 300 अब्ज द्या, अन्यथा बत्ती गूल करू; चीनी कंपन्यांची पाकिस्तानला धमकी
या सर्व घटनांपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकार सामान्य नागरिकांना मुस्लिमांच्या मागे पाठवले जात आहे. त्यात मशिदी, ताजमहाल आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. देशाची लूट करून पळून गेलेल्या लोकांचे पैसे परत मिळवण्याऐवजी त्यांना मुघल काळात बांधलेल्या मालमत्तांचे नुकसान करायचे असल्याचा आरोपही मुफ्ती यांनी केला आहे.
Web Title: Our Country Is Behind Even Bangladesh Pakistan Nepal As Far As Poverty Is Concerned Says Mehbooba Mufti
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..