300 अब्ज द्या, अन्यथा बत्ती गूल करू; चीनी कंपन्यांची पाकिस्तानला धमकी| Pakistan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity

300 अब्ज द्या, अन्यथा बत्ती गूल करू; चीनी कंपन्यांची पाकिस्तानला धमकी

इस्लामाबाद : चिनी कंपन्यांनी पाकिस्तान (Pakistan) सरकारला उघडपणे धमकी दिली आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानने जर त्यांचे 300 अब्ज रुपये दिले नाहीत तर, ते पाकिस्तानची बत्ती गूल करतील असा इशारा देण्यात आला आहे. चीनच्या या भूमिकेनंतर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला त्याचा जवळचा मित्र चीनकडून मोठा धक्का बसला आहे. (Pakistan News)

हेही वाचा: श्रीलंकेत हिंसाचार, माजी पंतप्रधानांनी नौदल तळावर घेतला आश्रय

पाकिस्तानने चीनी कंपन्यांची जवळपास 300 अब्जांहून अधिकची रक्कम देणे बाकी आहे. दरम्यान, ही रक्कम न दिल्यास महिना अखेरपर्यंत नाईलाजास्तव पावर प्लांट (Power Plant) बंद करावे लागतील असे चीनी कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आगाऊ पैसे न दिल्यास वीज प्रकल्प बंद करू, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: दलित असल्यानेच खासदार नवनीत राणांवर अन्याय - रामदास आठवले

चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत 30 चीनी कंपन्या पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत आणि पाकिस्तानच्या ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतर क्षेत्रांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात दबदबा आहे. दरम्यान, सोमवारी पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यामध्ये सेवा देणाऱ्या चिनी कंपन्यांनी थकीत रकमेबाबत विचारणार करण्यात आली. त्यावेळी इक्बाल यांच्याकडे यावर काही बोलण्यासारखे नव्हते. या बैठकीत चीनी अधिकाऱ्यांनी इक्बाल यांच्याकडे क्लिष्ट व्हिसा प्रक्रिया, कर आदी विषयांबाबत अनेक तक्रारी मांडल्याने पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने म्हटले आहे. तसेच थकित रक्कम न भरल्यास आगामी काही दिवसात वीज प्रकल्प बंद करण्याचा इशारा चीनी कंपन्यांनी दिला आहे.

हेही वाचा: जनता पुन्हा घेऊ शकणार सरकार दरबारी धाव; गृहविभागाचा निर्णय

इक्बाल यांच्याकडून कंपन्यांना आश्वासन

दरम्यान, चीनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत मंत्री इक्बाल यांच्याकडून उद्भवलेल्या प्रश्नाची दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकार्‍यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यास आणि त्वरित पैसे देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. चालू महिनाभरात त्यांची आर्थिक अडचण दूर केली जाईल, असे आश्वासन इक्बाल यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

Web Title: Chinese Firm Warns To Pakistan If Not Pai 300 Billion Will Shut Down Power Plants

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top