'भाजप आमदाराला झोडपणारे लोक आमचे नव्हेत'; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा निर्वाळा

rakesh tiakit
rakesh tiakit
Updated on

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. पण अद्याप या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडून पुरेसं लक्ष दिलं गेलं नाहीये. जवळपास चार महिन्यांहून अधिक काळ ऐन थंडीत, अवकाळी पावसात आणि आता उन्हातान्हात हे शेतकरी आपल्या मागण्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून ठाम आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या शेतकऱ्यांचा रोष वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय पंजाबमधील एका घटनेत दिसून आला आहे. पंजाबमध्ये नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अबोहर येथील भाजपचे आमदार अरुण नारंग यांच्यावर हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. मात्र, हे हल्ला करणारे आमचे आंदोलक शेतकरी नसल्याचा निर्वाळा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. 

संतत्प जमावाने भाजप आमदाराला मारहाण करत कपडे फाडल्याची बातमी आली होती. जमावाच्या गराड्यात अडकलेल्या नग्नावस्थेतील आमदार नारंग यांना पोलिसांनी सुरक्षितस्थळी नेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे. आमदार नारंग यांनी शनिवारी पंजाबमधील मलोट शहरातील भाजप कार्यालयात राज्य सरकारविरोधात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ही घटना घडली. संतत्प शेतकऱ्यांनी आमदाराला मारहाण केली तसेच तोंडाला काळेही फासले. नारंग भाजप कार्यालयात पोहोचताच जमावाने त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर शाईफेक केली होती. 

याबाबत आता शेतकरी आंदोलकांची बाजू समोर आली आहे. या घटनेमध्ये आमचे लोक नव्हते. आमच्या आंदोलक शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले हे खरं आहे. मात्र, या हिंसक घटनेमध्ये आमच्या आंदोलक लोकांचा समावेश नव्हता. इतकंच नव्हे, तर हे कृत्य भाजपच्याच लोकांकडून शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी घडवून आणण्यात आल्याचंही भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com