
एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह कुटुंबीयांना जाळले; स्वतः केली आत्महत्या
एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने प्रेयसीच्या कुटुंबीयांना पेट्रोल ओतून जाळले. यानंतर स्वतःही आत्मदहन केले. ही घटना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील मोतीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अचलपूर गावात शनिवारी घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विमल असे मृत माथेफिरू प्रियकराचे नाव आहे. (Out of one-sided love, Mathefiru burned the family along with his girlfriend)
प्राप्त माहितीनुसार, मुलीने लग्नासाठी नकार दिल्याने माथेफिरू प्रियकर विमलने आधी रामनाथ, नंदनी, महेश आणि नर्मिला यांच्यावर पेट्रोल शिंपडले आणि चौघांनाही जाळून टाकले. नंतर स्वतः आत्मदहन केले. अचलपूर गावात राहणाऱ्या रामनाथची १८ वर्षीय मुलगी नंदनीवर माथेफिरू लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र, तिने लग्नास नकार दिल्याने माथेफिरूने हे कृत्य केल्याचे गोंडाचे पोलिस उपअधीक्षक लक्ष्मीकांत गौतम यांनी सांगितले.
हेही वाचा: विवाहितेचे प्रेमसंबंध; पतीला समजता प्रियकरासह मिळून केला गेम
आगीत भाजलेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मृत विमलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस सखोल तपास करीत असल्याचे पोलिस उपअधीक्षक लक्ष्मीकांत गौतम यांनी सांगितले.
Web Title: Out Of One Sided Love Mathefiru Burned The Family Along With His Girlfriend Suicide Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..