Murder : विवाहितेचे प्रेमसंबंध; पतीला समजता प्रियकरासह मिळून केला गेम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband murder in love affair of wife

विवाहितेचे प्रेमसंबंध; पतीला समजता प्रियकरासह मिळून केला गेम

राजधानी नवी दिल्लीत पुन्हा एकदा नातेसंबंधांची हत्या झाली. पत्नीने प्रियकरासह पतीची हत्या (murder) केली. यानंतर पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिच्या कटाचे रहस्य उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक केली आहे. अर्जुन घोष (३७) असे मृताचे नाव आहे. (Husband murder in love affair of wife)

मृत अर्जुन घोषची पत्नी सोनाली घोष हिचे मोहन नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची (love affair) माहिती पती अर्जुनला झाली होती. त्यामुळे अर्जुन घोष पत्नी सोनालीसोबत रोज भांडण करीत होता. शुक्रवारी पुन्हा एकदा दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पत्नीने प्रियकरासह पती अर्जुन याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून (murder) केला, असे स्थानिक पोलिस स्टेशनचे एसएचओ बलबीर सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा: सुशील चंद्र म्हणाले, मतदार यादीशी होणार आधार कार्ड लिंक; लवकरच नियम

दुष्ट पत्नीने हे गूढ उकलण्याचा कट रचला आणि पहाटे घरातून निघून गेली. शुक्रवारी दुपारी घरी आल्यावर तिने पोलिसांना फोन केला आणि तिच्या पतीला कोणीतरी मारले (murder) आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केल्यावर संशयाची सुई पत्नीकडे वळली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आणि तिनेच प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याचे समोर आले.

Web Title: Married Love Affair Husband Murder Crime News Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :murderCrime Newsdelhi
go to top