esakal | भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर
sakal

बोलून बातमी शोधा

भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर

भिंत कोसळली म्हणून धर्मांतर

- आमच्या इच्छेनुसार धर्मांतर

- पोलिसांकडून धमक्या

- आम्हाला समजल जातयं अस्पृश्य

भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडूतील कोईम्बतूर जिल्ह्यात सुमारे 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचा दावा तमिळ पुलिगल काची नावाच्या एक दलित संघटनेने केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संघटनेच्या माहितीनुसार, 5 जानेवारीनंतर जवळपास 40 कुटुंबीयांचे धर्मांतर करण्यात आले आहे. त्यातील प्रक्रिया अद्याप सुरु आहे. 

भिंत कोसळली म्हणून धर्मांतर

दलितांनी अचानक एवढ्या मोठ्या संख्येने धर्मांतर करण्याच्या मागे भिंत कोसळल्याचे कारण देण्यात येत आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता यातील काहींनी धर्मांतर केले आहे.

Video : पोलिस अधिकाऱ्याने ओळखले नाही म्हणून मंत्र्याने...

आमच्या इच्छेनुसार धर्मांतर

आमच्या इच्छेनुसार हे धर्मांतर केले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून इस्लाम धर्माने आम्ही प्रेरित होतो. आता मी इस्लामचे धार्मिक कायदे आणि सिद्धांतांच्या कारणास्तव धर्माचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर कोणाच्याही सांगण्यावरून घेतला नाही. 

पोलिसांकडून धमक्या

आम्ही प्रामाणिकपणे इस्लाम धर्म स्वीकारत आहोत. तसेच स्वेच्छेने मुस्लिम नावे स्वीकारत आहोत. जे लोक कायद्यानुसार धर्मांतर करत आहेत, त्यांना पोलिसांकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आम्हाला समजल जातयं अस्पृश्य

आमच्यासोबत वारंवार भेदभाव, हल्ला आणि अपमान होतो आहे. आम्हाला अस्पृश्य समजलं जात आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश करणे आणि दुसऱ्यांसोबत दुकानात चहा पिण्याची परवानगी नाही. 

loading image