भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 लाखांवर; महाराष्ट्रातील पोलिस...

वृत्तसंस्था
शनिवार, 25 जुलै 2020

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13,36,861

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर आता भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13,36,861 झाली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,56,071 वर गेली आहे. यातील विशेष बाब म्हणजे 8,49,431 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

गेल्या 24 तासांमध्ये 48,000 पेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 757 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,56,071 वर गेली आहे. आता त्यांच्यावर उपचारही सुरु आहेत. तर आत्तापर्यंत आठ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 31,358 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे.

महाराष्ट्रातील 8 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना

कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे पोलिसांवर याच्या अंमलबजावणीची जबाबदारी होती. त्यानुसार पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. पण आता यातील तब्बल 8,232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत 800 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 6314 पोलिसांवर कोरोनावरील उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

शिवराजसिंह चौहानही कोरोना पॉझिटिव्ह

राजस्थानचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती खुद्द शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून दिली.

कोरोनाबाधित रुग्णांवर सातत्याने लक्ष

सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांना सरसकट रुग्णालयात दाखल केले जात नाही. कोरोना पॉझिटिव्ह आहे पण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण केले जात आहे. त्यांच्यावर सातत्याने देखरेखही ठेवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 48000 Covid Cases In India In 24 hours Total Cases At 1336861