भारतात कोरोनाचा उद्रेक; सलग पाचव्या दिवशी ७५ हजार पार

over 75000 new cases recorded in in India fift day in row
over 75000 new cases recorded in in India fift day in row
Updated on

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा एकप्रकारे उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात सलग पाच दिवसांपासून ७५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. काल (ता. ३१) एका दिवसात भारतात एकूण ७९हजार ४५७ रुग्णांची नोंद झाली आहे. ही चिंताजनक बाब आहे.

देशात आतापर्यंत  covid19india.org च्या माहितीनुसार ३६लाख २४ हजार ६१३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी २७लाख ७२ हजार ९२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापैकी काल एका दिवसात भारतात एकूण ६०हजार ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही ६४ हजार ६४६ झाली असून काल एका दिवसात कोरोनामुळे ९६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही आता ७ लाख ८४ हजार १७९ एवढी झाली आहे. वरील आकडेवारी ही ३१ ऑगस्टच्या सकाळी ११ वाजेपर्यंतची आहे.

दरम्यान, भारतात आतापर्यंत एकूण ४.२ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये पॉजिटिव्हिटी रेट हा ८.६ टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट आता ७६.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. भारत हा सध्या कोरोनाग्रस्तांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असून भारताच्या पुढे अमेरिका पहिल्या स्थानावर तर ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ही अशीच वाढत राहिली. तर भारत लवकरच कोरोनाग्रस्तांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

मागील पाच दिवसांची आकडेवारी
३० ऑगस्ट - ७९ हजार ४५७
२९ ऑगस्ट - ७८ हजार ४७९
२८ ऑगस्ट - ७६ हजार ६५७
२७ ऑगस्ट - ७६ हजार ८२७
२६ ऑगस्ट - ७५ हजार ९९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com