
हैदराबाद : विरोधक नाकर्ते आहेत आणि भाजपला एकगठ्ठा हिंदूंची मते मिळत आहेत, त्यामुळेच भाजप सातत्याने विजयी होत आहे, असे मत हैदराबादमधील एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. त्याचप्रमाणे मोदी विरोधकांच्या मतदारांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला आहे.