

Tipu Sultan Row Owaisi Targets BJP Over Historical Claims
Esakal
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संपकाळ यांनी टिपू सुल्तानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकाळ यांच्यावर घणाघाती टीका केलीय. ही लाजीरवाणी बाब असून जोडे चाटण्याचा प्रकार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. तर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. टिपू सुल्तान हिंदू मुस्लिम एकतेचं उदाहरण होते असं ओवैसी यांनी म्हटलंय.