esakal | भारतात कोरोना लशीची चाचणी; पहिल्या दिवशी 100 जणांना टोचणार लस 
sakal

बोलून बातमी शोधा

 oxford covid 19 vaccine serum institute phase 3 trials India

भारतातही या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. पण, तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर लस देण्यात आलेली नाही. येत्या 22 ऑगस्टपासून भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.

भारतात कोरोना लशीची चाचणी; पहिल्या दिवशी 100 जणांना टोचणार लस 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : भारतात ऑक्सफर्डच्या कोरोना लशीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा या आठवड्यात सुरु होईल असं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मंगळवारी सांगितलं होतं. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी शनिवारी 22 ऑगस्टला सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी किमान शंभर लोकांना कोरोनाची लस टोचली जाईल, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑक्सफर्डने (oxford covid 19 vaccine) तयार केलेल्या या लशीची सीरम इन्स्टिट्यूटकडून देशातील 20 ठिकाणी चाचणी होणार आहे.

देशभरातील इतर घडामोडींसाठी येथे क्लिक करा

भारतातील चाचणी महत्त्वाची
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोनावर लस तयार केलीय. त्याचे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रिझर्ल्टस चांगले आले आहेत. या लसीचा मानवी शरिरावर कोणताही वाईट परिणाम किंवा रिऍक्शन येत नसल्याचं स्पष्ट झालंय. भारतातही या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. पण, तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर लस देण्यात आलेली नाही. येत्या 22 ऑगस्टपासून भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यास भारतात लस देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट (serum institute) या औषध निर्माण कंपनीचा ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार झाला असून, या करारानुसार लशीची चाचणी यशस्वी झाली तर, पुण्यात या सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या लशीची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार भारतात चाचणी यशस्वी झाली तर, वर्षाअखेरपर्यंत लसही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

जगभरातील इतर घडामोडींसाठी येथे क्लिक करा

एकूण 20 केंद्रांवर चाचणी
लशीच्या चाचणी संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, या टप्प्यात 1600 जणांना लस देण्यात येणार आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांबरोबरच गुजरातमध्ये अहमदाबाद येथेही लशीचे डोस देण्यात येणार आहेत. देशात एकूण 20 केंद्रांवर या लशीची चाचणी होणार असल्याची माहिती आहे. लशीच्या चाचणीसाठी देशातील 20 हॉस्पिटल्सची निवड करण्यात आलीय. यात कोरोनाच्या हॉटस्पॉटमधील हॉस्पिटल्सचाही समावेश असणार आहे. यात आयसीएमआरशी संलग्न 11-12 हॉस्पिटल्सचा समावेश असेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या टप्प्यातील लशीच्या चाचणीला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशात ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या शरिरात ऍंटिबॉडिज् तयार झालेल्या असतात. त्यामुळे लागण होऊन बरे झालेल्यांवर या लशीचा प्रयोग केला जाणार नाही. आतापर्यंत ज्या व्यक्तींना लागण झालेली नाही, अशाच व्यक्तींना लशीचे डोस देण्यात येणार आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

loading image
go to top