पी. चिदंबरम यांना जामीन देताना सुप्रीम कोर्टाच्या पाच अटी!

टीम ई-सकाळ
Wednesday, 4 December 2019

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने 21 ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानात घुसून अटक केली होती

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात त्यांना सीबीआयनं अटक केली होती. तब्बल 107 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झालाय. जामीन मंजूर करताना कोर्टाकडून चिदंबरम यांना काही अटी सांगण्यात आल्या आहेत. त्या अटी चिदंबरम यांना पाळाव्या लागणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

केव्हा झाली अटक?
आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने 21 ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानात घुसून अटक केली होती. त्यांच्या निवासस्थानाला जणू छावणीचं स्वरूप आलं होतं. या प्रकारणातील साक्षीदारांना फितवण्याचा प्रयत्न चिदंबरम करत आहेत. असा आरोप सीबाआयकडून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवरच त्यांना अटक केली होती. पण, 107 दिवसांनंतर चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका केली आहे. त्याचवेळी त्यांना परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मज्जाव केलाय. चिदंबरम यांच्याकडून कोर्टात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मंडली. सुरुवातीला चिदंबरम यांना सीबाआय कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार कारागृहात केली होती. कारागृहात असताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांची भेट घेतली होती. 

आणखी वाचा - मराठा आरक्षण आंदोलनप्रकरणी संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

आणखी वाचा - शिवसेना म्हणते, अजित पवारांचा पापडही भाजपला भाजता आला नाही

काय आहेत सुप्रीम कोर्टाच्या अटी?

  • खटल्यातील साक्षीदारांना भेटू नका
  • परवानगी शिवाय देश सोडून जाऊन नका 
  • मीडियाला कोणताही बाईट देऊ नका 
  • ईडी चौकशीला बोलवेल तेव्हा हजर राहा
  • कोणतेही सार्वजनिक विधान करून नका 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: p chidambaram got bail from supreme court in inx media case