K. V. Rabiya : साक्षरता मोहिमेची नायिका हरपली; केरळमधील सामाजिक कार्यकर्त्या के.व्ही. राबिया यांचे निधन
Inspiration India : केरळमधील साक्षरता अभियानात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्त्या के. व्ही. राबिया यांचे निधन झाले. त्यांनी दिव्यांग असूनही सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभी केली.
मलप्पुरम (केरळ) : केरळच्या साक्षरता मोहिमेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्या के.व्ही. राबिया (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने येथील रुग्णालयात रविवारी निधन झाले.