
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज घोषणा करण्यात आली. माजी न्या. जगदिशसिंग केहर, दिवंगत मल्याळी साहित्यिक एम.टी. वासुदेवन नायर, दिवंगत भोजपुरी गायिका शारदा सिन्हा यांना पद्मविभूषण जाहीर झाला. लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत नेते मनोहर जोशी, दिवंगत गझल गायक पंकज उधास, राम जन्मभूमी आंदोलनातील फायरब्रँड हिंदुत्ववादी नेत्या व प्रवचनकार साध्वी ऋतंभरा, प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर, बिहारमधील दिवंगत भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना पद्मभूषण तर मराठी अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.