केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल 270 वर्षांनंतर होणार ऐतिहासिक 'महाकुंभाभिषेक'; काय आहे यामागचा मुख्य उद्देश?
Padmanabhaswamy Temple Kerala : भगवान पद्मनाभ स्वामींच्या जगभरातील भक्तांसाठी हा विधी पाहणे म्हणजे एक दुर्मिळ योग आहे. ८ जून रोजी होणाऱ्या महाकुंभाभिषेकम पूर्वी मंदिरात आचार्य वरणम्, प्रसाद शुद्धी, धारा, कलशम् आणि इतर अनेक विधी पार पडणार आहेत.
नवी दिल्ली : केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात (Padmanabhaswamy Temple) २७० वर्षांनंतर एक दुर्मिळ असा 'महाकुंभाभिषेकम' (Mahakumbhabhishekam) होणार आहे. हा विधी ८ जून रोजी पार पडणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.