

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांकडून कठोर कारवाई केली जात आहे. लष्कर ए तोयबाच्या ७ दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ, कुलगाम आणि पुलवामा या जिल्ह्यात ही कारवाई केलीय.