

Pahalgam
esakal
श्रीनगर: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही या हल्ल्याचा सूत्रधार साजिद जट्ट आणि त्याचे सहकारी मोकाटच आहेत. ‘लष्करे तैय्यबा’ आणि ‘दी रेझिस्टन्स फ्रंट’ या दोन संघटनांशी त्यांचा संबंध आहे. ओळख आणि वेश बदलून साजिद पाकिस्तानमध्ये फिरत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. भारतीय गुप्तचर आणि तपाससंस्था त्याच्या मागावर आहेत
सध्या राष्ट्रीय तपास संस्था देखील (एनआयए) या हल्ल्याचा तपास करत असून साजिद, त्याच्या सहकाऱ्याविषयी ठोस माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर संस्थांच्या भीतीमुळे तो वारंवार जागा बदलत असल्याची माहिती उघड झाली आहे.
साजिद मध्यंतरी रावळपिंडीमध्येही वास्तव्यास होता. तिथे भाड्याच्या खोलीमध्ये त्याचे वास्तव्य होते, अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय त्याला मदत करत असल्याचे दिसून आले.