
पहलगाम : पूर्णतः पर्यटनावर अवलंबून असलेलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हळूहळू सावरतंय... सगळ्यांचं एकच म्हणणं - आम्हाला दहशतवाद नकोय. हॉटेल व्यावसायिक, हस्तकला कारागीर, कापड व्यावसायिक, गाइड, घोडेवाले, मसाले-सुकामेवा विक्रेते, हाताने गालिचे (गब्बे) विणणारे, टॅक्सीचालक आदी सगळ्यांची मदार पर्यटनावर आहे. कोरोनाच्या साथीनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पर्यटक यायला सुरुवात झाली होती. पण दहशतवादी हल्ल्याने सगळ्याला खीळ बसली.