
डोंबिवली: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, यात डोंबिवलीमधील तिघां पर्यटकांचा मृत्यू झाला. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या नातेवाईकांचा यात मृत्यू झाला असून त्यांच्या मुलांनी मंगळवारी घडलेल्या घटनेचा थरार सांगितला.
''वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली.. त्यांचे डोके माझ्या हातात होते. रक्ताने माखलेले ते माझ्या वडिलांचे डोके..'' असे म्हणताच हर्षल भावुक झाला. त्याच्या ओठातून शब्दच फुटत नव्हते. हर्षलची मामी अनुष्का यांनी त्याला यावेळी धीर दिला.