कर्नाल (हरियाना) - पहलगामच्या हल्ल्यात कर्नालचे नौदलातील लेफ्टनंट विनय नरवाल (वय २६) यांचा मृत्यू झाला. विवाहानंतर विनय आणि पत्नी हिमांशी फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. दोघांचा १६ एप्रिल रोजी मसुरी येथे विवाह झाला..हिमांशी या गुरुग्रामच्या रहिवासी असून १९ एप्रिल रोजी कर्नालमध्ये स्वागत समारंभही झाला होता. मात्र सात दिवसांतच विनय-हिमांशी यांचा संसार मोडला. काही दिवसांपासून आनंदात असलेले ‘सेक्टर सात’ विनय यांच्या मृत्यूने शोकसागरात बुडाले. दरम्यान, सायंकाळी विनय यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..विनय यांची आत्या माया देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव दांपत्य मधुचंद्रासाठी काश्मीरला गेले हेाते. सेक्टर सात येथे त्यांचे घर असून नुकत्याच झालेल्या विवाहामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. विनय यांचे आजोबा दादा सिंह हे निवृत्त पोलिस अधिकारी. वडिल सीमा शुल्क विभागात आणि आई गृहिणी. बहिण सृष्टी ही विनयपेक्षा लहान..विनय आणि हिमांशी हे नियोजनानुसार काश्मीरच्या सहलीवर होते.मात्र मंगळवारी दुपारी पहलगामवर हल्ला झाल्याचे वृत्त घरात येऊन धडकले अन् घरातील लोकांचा काळजाचा ठोका चुकला. विनय आणि हिमांशी हे ज्या ठिकाणी होते तेथेच हल्ला झाल्याचे कळताच कुटुंबातील सदस्य सुन्न झाले. सर्वजण सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागले.मात्र थोड्याच वेळात फोन खणखणला आणि नको ती बातमी कळाली. विनयला गोळी लागल्याचे कळाले आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. हिमांशी देखील जखमी असल्याचे कळाले. दुर्दैवाने विनयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला..एक मे रोजी होता वाढदिवसविनय नरवाल यांचा एक मे रोजी वाढदिवस होता आणि त्याची जोरात तयारी सुरू केली होती. विवाहानंतरचा पहिला वाढदिवस होता. विनय यांचे कुटुंब प्रामुख्याने कर्नाल गावच्या भुस्ली गावचे आहे. बऱ्याच काळापासून ते सेक्टर सातमध्ये राहत होते. लष्करात जाण्याचे विनयचे स्वप्न होते..फोटो व्हायरलहल्ल्यात जखमी झालेले विनय आणि त्याच्या बाजूला स्तब्ध बसलेली हिमांशी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोतून हल्ल्याची तीव्रता कळते.३० हून अधिक जवान हुतात्मा१९६२ च्या भारत चीन युद्धापासून ते पहलगाम हल्ल्यापर्यंत कर्नाल जिल्ह्यातील तीस हून अधिक जवान आणि लष्करी अधिकाऱ्यांनी बलिदान दिले आहे. कर्नालच्या भूमिपुत्रांनी वेळोवेळी शत्रूच्या सैनिकांचे मनसुबे उधळून लावले आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.