राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहलगामच्या हल्ल्यातील दहशतवादी अद्याप सापडले नसल्याबद्दल सरकारला सवाल केला आणि हल्लेखोर पकडले जात नाहीत, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरणार नाही असा इशाराही दिला. .लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘जोपर्यंत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे हल्लेखोर पकडले जात नाहीत, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूरला यशस्वी म्हणता येणार नाही.’पंडित नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी संरक्षण दलांना प्रोत्साहन दिले नव्हते या आशयाच्या भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांच्या विधानांवर सुप्रिया सुळे यानी तीव्र शब्दात आक्षेप घेतला. तसेच ते चुकीचा इतिहास शिकून दावे करत असल्याचेही फटकारले. परदेशात शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी विरोधकांना सरकारने सांगणे ही सशक्त लोकशाही असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या..संघर्षविराम केल्यानंतर जगभरातील सर्व देशांनी आपली प्रशंसा केली. संघर्षविराम एका दिवसात झाला. मात्र संघर्षातून नेमके काय साधले असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी दहशतवादी अजमल कसाबला पोलिस तुकाराम ओंबळे यांनी जिवंत पकडले. त्याचे श्रेय तत्कालीन सरकारांचे आहे असे आपण म्हणणार नाही.परंतु त्याला न्यायालयीन प्रक्रियेतून फाशीची शिक्षा दिली याकडेही सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले. तसेच पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांचा त्यांनी उल्लेख केला. आपल्याला न्याय कधी मिळेल हा या कुटुंबीयांचा आर्त सवाल असल्याकडे लक्ष वेधताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले, की सरकारने जगदाळे यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण झाले नाही..विरोधक कोत्या मनाचे - तटकरेराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर मराठीतून बोलताना केंद्र सरकारची जोरदार पाठराखण केली. विरोधक कोत्या मनाचे असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. ‘दहशतवादाविरुद्ध प्रगल्भ कारवाई झाली आहे. आधीची सरकारने दहशतवादाविरुद्ध कारवाईत अपयशी ठरली होती. परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली आता कणखर प्रत्युत्तर देण्यात आले..अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींची प्रशंसा केल्याचे उदाहरण देत तटकरे यांनी विरोधकांना डिवचले. दरम्यान, मुंबईतील २००६ मधील बाँबस्फोट प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यात केंद्र सरकारनेही महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी मागणीही तटकरे यांनी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.