
नवी दिल्लीः आपल्या विषारी वक्तव्याने चर्चेत आलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे देश सोडून पळून गेल्याची चर्चा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात आक्रमक पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शेजारील देशामध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी नेते युद्धावरुन वाचाळगिरी करत असल्याचं दिसून येत आहे.