भुवनेश्वर - ‘आम्ही बैसरन व्हॅलीत पोहोचताच मला फटाक्यांसारखे आवाज ऐकू आले आणि त्याचवेळी माझ्या पतीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. मी काही हालचाल करण्यापूर्वीच ते कोसळले,’ हे सांगताना प्रियदर्शनी सत्पथी यांना रडू आवरत नव्हते. त्यांचे पती प्रशांतकुमार सत्पथी (वय-४३) हे हल्ल्यात मारले गेले.