ओडिशात पैकांच्या बंडाचे स्मारकाचे रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिलान्यास

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 डिसेंबर 2019

ओडिशातील पैका या लढवय्या जमातीने ब्रिटिशांविरोधात केलेल्या बंडाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने येथे भव्य स्मारक उभारले जात असून, या स्मारकाचा शिलान्यास आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाला. पैकांनी १८१७ मध्ये ब्रिटिशांविरोधात सर्वप्रथम बंड केले होते, हा पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणूनही ओळखला जातो.

भुवनेश्‍वर  - ओडिशातील पैका या लढवय्या जमातीने ब्रिटिशांविरोधात केलेल्या बंडाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने येथे भव्य स्मारक उभारले जात असून, या स्मारकाचा शिलान्यास आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाला. पैकांनी १८१७ मध्ये ब्रिटिशांविरोधात सर्वप्रथम बंड केले होते, हा पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणूनही ओळखला जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप 

खुर्दा जिल्ह्यातील बारूनेई टेकड्यांच्या पायथ्याशी दहा एकर परिसरामध्ये हे भव्य स्मारक उभारले जाणार असून ते ओडिशातील आघाडीचे पर्यटन केंद्र बनेल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हे स्मारक तरुणांसाठी मोठा प्रेरणास्रोत बनेल, असे सांगतानाच राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, ओडिशात पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे, केंद्र सरकारदेखील पूर्व भारताच्या विकासाबाबत आग्रही आहे. ओडिशाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे.

कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान 

वेगळे टपाल तिकीट जारी
दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत पैका बंडाचा उल्लेख आदरपूर्वक केला होता.  या संदर्भात सरकारने एक टपाल तिकीटदेखील प्रसिद्ध केले होते. 

पटनाईक यांचे भाषण
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी, पैकांच्या शौर्यामुळेच ब्रिटिशांना १८०३ पर्यंत ओडिशा जिंकणे शक्‍य झाले नाही असे सांगितले. पैकांच्या बंडालाच देशाचा पहिला स्वातंत्र्यलढा जाहीर केला जावा, अशी मागणी ओडिशा सरकार बऱ्याच दिवसांपासून करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paika society Monument inauguration by ramnath kovind