कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये राजेश शुक्‍ला यांचा समावेश होता. शुक्‍ला यांनी धाडस दाखवत आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या 11 जणांची सुटका केली. या मदतकार्यावेळी शुक्‍ला हे जखमी झाले असून, त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली : आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये राजेश शुक्‍ला यांचा समावेश होता. शुक्‍ला यांनी धाडस दाखवत आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या 11 जणांची सुटका केली. या मदतकार्यावेळी शुक्‍ला हे जखमी झाले असून, त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालयात जाऊन शुक्‍ला यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्‍ला यांच्या धाडसी कामगिरीचेही या वेळी जैन यांनी कौतुक केले. जैन यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, 'फायरमन राजेश शुक्‍ला हे खरे "हीरो' आहेत. आग लागलेल्या ठिकाणी थेट प्रवेश करून त्यांनी 11 जणांची मुक्तता केली. स्वतः जखमी होऊनही शुक्‍ला यांनी आपले कर्तव्य पार पाडले. शुक्‍ला यांच्या असामान्य कामगिरीला सलाम!''

राणेंच्या पणवतीमुळे भाजपची गाडी घसरली

दिल्लीतील अनाज मंडीतील इमारतीला आज लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात मुख्यत्वे कामगारांचा समावेश आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या अग्नितांडवाने देशाची राजधानी हादरून गेली. दिवसभर काम करून थकलेले कारखान्यातील कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

राष्ट्रवादीचे नेते म्हणतात, 'आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत'

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग वेगाने भडकली. काय झाले हे समजण्यापूर्वीच झोपेत असलेल्या कामगारांना आगीने वेढले. अग्निशामक दलाच्या सुमारे 150 जवानांनी आग लागलेल्या चार मजली इमारतींमधून 63 जणांना बाहेर काढले. 43 कामगारांवर मृत्यूने झडप घातली, तर अनेक जण जखमी झाले असल्याचे अग्निशामक दल आणि पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशामक दलाच्या दोन जवानांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगीत होरपळून आणि गुदमरल्यामुळे हे मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fireman Saved 11 People Trapped in Anaj Mandi Blaze