पाक कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही : रावत

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

कारगिलसारखी गोष्ट पुन्हा पाकिस्तान करेल असे आपल्याला वाटत नाही, कारण त्याचे काय परिणाम होतात हे त्यांनी पाहिले आहे, असे रावत म्हणाले.

नवी दिल्ली : पाकिस्तान 1999 मधील कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही, कारण त्यांना त्याचा परिणाम काय होतो हे माहीत आहे. सीमाभागात भारतीय लष्कर अत्यंत करडी नजर ठेवून आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केले. 

पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धातील विजयाला 20 वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येथील कोणताही भाग आपण सोडलेला नाही. आपल्या सैन्याच्या तुकड्या येथील प्रत्येक भागात गस्त घालत आहेत. पाकिस्तान पुन्हा कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करू शकतो काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना रावत यांनी वरील मत व्यक्त केले. कारगिलसारखी गोष्ट पुन्हा पाकिस्तान करेल असे आपल्याला वाटत नाही, कारण त्याचे काय परिणाम होतात हे त्यांनी पाहिले आहे, असे रावत म्हणाले.

या वेळी रावत यांनी कारगिलमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गीतकार समीर याने तयार केलेल्या अल्बमचे प्रकाशन केले. यामध्ये बॉलिवूडचे नायक अमिताभ बच्चन आणि अन्य कलाकार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pak did not repeat infiltration like Kargil says Rawat